सर्वात वर

भारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी

एंजल ब्रोकिंगची वेस्टेड फायनान्ससह भागीदारी  

मुंबई : एंजल ब्रोकिंगने (Angel Broking) भारतीय गुंतवणूकदारांना आंतराष्ट्रीय गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेस्टेड फायनान्ससह भागीदारीची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या शेअर्स आणि ईटीएफमध्ये केवळ एका क्लिकवर गुंतवणूक करणे यामुळे शक्य होणार आहे.

वेस्टेड फायनान्ससोबत करार केल्याने एंजल ब्रोकिंगने (Angel Broking) ग्राहकांना दिलेल्या सेवांमध्ये यामुळे आणखी भर पडली आहे. फ्रॅक्शनल शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता, किमान शिल्लक रक्कम आवश्यक नाही, कधीही पैसे काढणे आणि जलद आणि सुलभ साइन-अप प्रक्रिया आदींचा या नव्याने जोडल्या गेलेल्या सेवांमध्ये समावेश आहे.

एंजल ब्रोकिंगचे मुख्य विपणन अधिकारी श्री. प्रभाकर तिवारी म्हणाले, अमेरिकी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील नॅसडॅक आणि डो जोन्समध्ये नोंदणीकृत असलेल्या अनेक ग्लोबल लीडरपैकी अमेरिका एक मोठी बाजारपेठ आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना एंजल ब्रोकिंग वेस्टेडच्या माध्यमातून अमेरीकन बाजारातप्रवेश करण्याची संधी प्रदान करीत आहोत. या संधीतून गुंतवणूकदारांना भांडवली गुंतवणूकाचाही लाभ मिळेल. ज्यामुळे कोणताही ग्राहक संबंधित किंमतीवर कमीत-कमी स्टॉकही खरेदी करू शकतो. आमची नवीनतम जोडणी आमच्या ग्राहकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जीनोम-एडिटिंग टेक्नॉलॉजी सीआरआयएसपीआर सारख्या विषयक गुंतवणूकी प्री-बिल्ट पोर्टफोलिओसह चालविण्यास सक्षम करेल.’

एंजल ब्रोकिंगचे (Angel Broking) मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय अग्रवाल म्हणाले की, ‘भारतीय ग्राहकांना अमेरिकन बाजाराचे मोठे आकर्षण आहे. केवळ भौगौलिक विविधता हे त्याचे एकमेव कारण नाही तर चलन घसरणाच्या समभागांचा साठा हेही त्याचे मुख्य कारण आहे. एकूणच परताव्यात त्यामुळे मोठी भर पडते. याचमुळे अमेरिकी शेअर बाजारात जागतिक इक्विटी मुल्यांच्या ५०% पेक्षा अधिक शेअर्सची उलाढाल होते. देशातील बाजारात असे क्षमता असेलेले अनेक दिग्गज आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या या नवीन सहकार्य करारामुळे आमच्या ग्राहकांना अधिकाधिक फायदा मिळेल.’