सर्वात वर

सह्याद्रीच्या फार्म्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा !

सह्याद्रीची उतीसंवर्धीत (टिश्यू कल्चर ) केळी रोपे टेंभूर्णी येथील शेतकर्‍यांच्या शेतावर पोहचली

नाशिक – नाशिकच्या सह्याद्री फार्म्सच्या (Sahyadri Farms) शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. मातीविना माध्यमात वाढविलेली रोगमुक्त व सुक्ष्मकृमी (निमॅटोड) मुक्त रोप निर्माण करण्याच्या अद्यावत तंत्रज्ञान युक्त उतीसंवर्धीत (टिश्यू कल्चर ) केळी रोपे निर्मिती यंत्रणा सह्याद्री फार्म्स नुकतीच उभी केली आहे. 

मागील दोन महिन्यांपासून शेतकर्‍यांना रोप नोंदणी चालू करण्यात आली होती. काल (दिनांक १८ मे) रोजी टेंभूर्णी येथील शेतकरी यांना पहिली १५००० रोपांची बॅच पोच करण्यात आली. केळी उत्पादक शेतकर्‍यांना नक्कीच यामध्यमातून गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू असे सह्याद्री फार्म्स (Sahyadri Farms) तर्फे सांगण्यात आले आहे. 

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क साधावा – आकाश – 7066090803 / 7030915403 आणि  नितीन – 7066036357 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सह्याद्री फार्म्स तर्फे करण्यात आले आहे.