सर्वात वर

रेमडिसिव्हीरच्या स्टॉकबाबत अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलने केला खुलासा


नाशिक –
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल(Ashoka Medicover Hospital) हे बहुराष्ट्रीय हॉस्पिटल नेटवर्क चा भाग आहे,जेव्हा नाशिक मधीलडिस्ट्रिब्युटर  कडून रेमडिसिव्हीरचा स्टॉक उपलब्ध होत नव्हता तेव्हा, मेडीकव्हर हॉस्पिटल चे भारतातील इतर १६ हॉस्पिटल मधून १००० चा स्टॉक हा नाशिक,औरंगाबाद आणि संगमनेर शाखे साठी आला होता,असा खुलासा अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल ने केला आहे. 

या खुलासा मध्ये अशोका मेडीकव्हरने (Ashoka Medicover Hospital) म्हटले आहे हॉस्पिटलने रीतसर कंपनी कडून आलेला स्टॉक हा उपलब्ध झाल्या मुळे,काल एफडीए यांच्या विनंती नुसार १०० चा स्टॉक हा मालेगाव ला पाठवण्यात आला. या बाबत माननीय मंत्री श्री छगन भुजबळ साहेबानीही राज्याच्या एफडीए शी संपर्क करून याची खात्री केली आहे, 


शासनाच्या आदेशानुसार रेमडिसिव्हीर औषधांची जबाबदारी ही हॉस्पिटल ची असल्या कारणाने हॉस्पिटल ने हा स्टॉक मागवला गेला आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल ने सदरचा स्टॉक महाराष्ट्रातील मेडीकव्हरच्या तीन हॉस्पिटल साठी होता. 
सद्यस्थितीत अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मध्ये १५० पेक्षा अधिक रुग्ण दाखल आहेत व त्यासाठी रोज साधरण १८० ते १९० इंजेक्शन ची गरज असते. व सदर चा स्टॉक हा फक्त २/३ दिवस पुरेल इतकाच आहे. 


हॉस्पिटल प्रशासन हे प्रामुख्याने नमूद करते की,जी बातमी बाहेर प्रसिद्ध केली जात आहे ती माननीय तहसीलदार साहेब व एफडीए च्या अधिकारी यांच्या तपासा आधीच कुठलीही  सत्यता न पडतळता दिली गेली, हॉस्पिटल प्रशासनाने तपास अधिकाऱ्यांना तपासासाठी लागणारी सर्व कागदपत्र सादर केले आहे. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल (Ashoka Medicover Hospital) हे रुग्ण सेवे साठी सदैव तत्पर आहे असे हॉस्पिटलच्या प्रसनाकडून सांगण्यात आले आहे.