सर्वात वर

अवकॅडो फ्रुट -(आहार मालिका क्र – १७)

डॉ.राहुल रमेश चौधरी 

विदेशी फळफळावात आज आपण अवकॅडो (Avocado) या फळाची माहिती घेणार आहोत…..persia Americana या नावाने असलेले हे फळ मूळचे मध्य दक्षिण अमेरिकेतील हे फळ मारवत फळ,बटर फ्रुट, अॅलीगेटर पीअर या नावाने  देखील ओळखले जाते. अवकॅडो  (Avocado)आता इंडोनेशिया,ब्राझिल,ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ़्रिका येथे देखील लागवडीखाली येते.

भारतात दक्षिण भारत या बाजूला यचे उत्पादन घेतले जाते.फॅट म्हणजेच आयुर्वेदाच्या मेद या सप्तधातुंपैकी एक या बाबतीत हे फळ समृध्द आहे.व मेद हा या फळातील स्त्रोत आरोग्यदायी आहे.उच्चभ्रू मॉल मध्ये हे फळ आकर्षकरीत्या सजवून ठेवलेले बघायला मिळते.या फळाचे वजन १०० ग्रॅम पासून १ किलो पर्यंत भरते.

अवकॅडो (Avocado) या फळाचे गुणधर्म आपण बघूयात.

१.ह्या फळात oleic acid मोठ्या प्रमाणात मिळते.
२.याशिवाय vitamin A,B,C,C,E,K,FOLATE,NIACIN,BIOTIN ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणावर मिळतात.
३.हे फळ B-CAROTENE,LUTEIN,NEOCHROME,NEOXANTHIN या carotenoids ने समृध्द आहे.
४.याव्यतिरिक्त पोटॅशिअम,लोह,मॅग्नेशिअम,स्फुरद हे मिनरल्स या फळात मिळतात.
५.या फळामधील B-SITOSTEROL,CAMPESTEROL,STIGMASTEROL  हे फॅट्स आपल्या शरीराच्या सांध्याकरीता उपयुक्त आहे.
६.या फळामधून खाद्य तेल निर्माण देखील होते
७.रक्तामधील अतिरिक्त साचणाऱ्या cholesterol कमी करण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे हे संशोधनातून समोर आले आहे.
८.ह्या फळात तंतुमय पदार्थ जास्त उपलब्ध आहेत.
९.या फळाचा गर चेहऱ्यावर लावण्यासाठी देखील वापरतात,ह्या फळातील अॅन्टीऑक्सिडंट मुळे शरीरातील पेशींचे free radicals पासून रक्षण होते परिणामी त्वचेचे रक्षण होते.
१०.उन्हाळ्यामध्ये हे फळ शरीरातील उर्जा भरून काढण्यास व उत्साह टीकवून ठेवण्यास उपयुक्त ठरते.
११.ह्या फळापासून काढलेल्या तेलाचा उपयोग त्वचा मऊ ठेवणे व त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरते.
१२.ह्या फळाच्या नियमीत सेवनाने त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते तसेच त्वचेचे सूर्यापासून देखील संरक्षण होते.
१३.त्वचा मुलायम राखण्याकरीता तसेच प्रौढ नागरिकांमध्ये wrinckles,aging factor टाळण्याकरीता या फळाचा उपयोग होतो यातील collagen मुळे त्वचा लवचिक राहते.
१४.या फळाच्या तेलाने राठ,रुक्ष केस मुलायम मऊ व दाट होतात
१५.आयुर्वेद शास्त्रात चालू संशोधनात ज्या पंचकर्म उपचारात औषधी तूपांचा वापर होतो व ज्या रुग्णांना तूप देणे शक्य नाही त्याठिकाणी या फळाच्या मेद वापरता येईल का याची चाचपणी सुरु आहे

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी 


संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०