सर्वात वर

हदगा / अगस्ताचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र -२)

डॉ राहुल रमेश चौधरी

आज काल फळभाज्या ,पालेभाज्या,रानभाज्या खायची सवय राहिलेली नाही अश्यात हदगा सारखी भाजी दुर्मिळच म्हणायला हवी,अश्यात आयुर्वेद दूर्मिळ मिळणाऱ्या भाज्या खायचा आग्रह धरतो,आणि का नाही धरावा,तो योग्यच आहे.अगस्ता/हदगा याचे शास्त्रीय नाव (Sesbania Grandiflora)हा दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आणि भारतात दक्षिणेस तसेच महाराष्ट्रात कोकण,रत्नागिरी भागात आढळणारी भाजी बाकी शहरात पण मिळते पण फार कष्टानेच,म्ह्णून ही भाजी सर्वाना अपरिचीतच.

अगस्ता/हदगा (Ayurvedic Medicine Plant) सुमारे ८ ते १० मीटर उंच असतात. या झाडास पिवळसर पांढऱ्या वा लालसर रंगाची फुले येतात त्यावरून हदग्याच्या दोन उपजाती होतात.पाने आवळ्याप्रमाणे असतात. हे झाड नाजुक असते व याचे ३ ते ५ वर्षापेक्षा जास्त आयुष्मान असत नाही. यास कोकणात हदगा म्हणतात. याची फुले साधारणतः फेब्रुवारीत येतात.

आरोग्यासाठी (Ayurvedic Medicine Plant) हदग्याचे फायदे

१)भाजी,भजी,पराठे यासाठी प्रसिध्द हदगा फुले,पाने,शेंगा आरोग्यासाठी उपयोगी आहे.

२)सतत जंत होण्याची सवय असणाऱ्या रुग्णात हदग्याची भाजी कायम जेवणात ठेवावी.जंताची प्रवृत्ती कमी होते,

३)लघवीचा वास येणे,गढूळपणा असणे,लघवी चिगट होणे या तक्रारींमध्ये हदगा पानांचा रस रोज रात्री १ कप घ्यावा.

४)अतिशय जुनाट खोकला असेल तर हदगा पाने रस व मध एकत्र दिवसातून

५)जेवण केल्यावर सुस्ती येणे,जडपणा वाटणे,डोळे जड पडणे,पांघरून घेवून झोपावेसे
वाटणे अश्या तक्रारीत हदगा भाजी व नागलीची भाकरी खावी.

६)नाकात मांसाकुर वाढणे, सर्दी होणे,वास न येणे या तक्रारीत हदगा पानांचा रसदिवसाच्या योग्य वेळेत नस्य करावे.

७)लहान मुलांना सतत सर्दी होत असल्यास पानांचा र.स कपाळ ,कानशीला वर लावावा.

८)रात्रीच्या वेळी न दिसणे (रातांधळेपणा) विकारात शेळीच्या दूधाच्या भिजवलेल्या कापसाच्या घड्या ठेवाव्यात,हदगाच्या पानांचा रस नाकात नस्य म्हणून टाकावा,हदगा फुले,पाने,शेंगा याची भाजी खावी.तसेच शेळीच्या दूधाचे थेंब डोळ्यात टाकतराहावे.

९)डांग्या खोकला मध्ये हदगा पाने रस व कांदा रस मिश्रणत घ्यावे.

१०)अंगावरून पांढरे पाणी जात असल्यास हदगा फुले तुपात परतून खावीत.

११)हदगा शेंगा अंगावर गाठी उठणे,पोटात वायू होणे,खडा संडास होणे यात वापर
करावा.

सावधान!!

१.शेंगाचा वापर पित्तप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींनी करू नये.
२.वरील सर्व प्रयोग व त्यांचे प्रमाण वैद्यांच्या सल्ल्यानुसारच करावे.
३.वातप्रकृतीच्या व्यक्तींनी योग्य संस्कार करून भाजी खावी.
४.हदगा प्रयोगासह योग्य ते औषधोपचार घ्यावे.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०