सर्वात वर

तिरफळाचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र -९)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

कोकण आणि गोवा वासीयांना खास करून परिचित आणि भारतच काय सर्वच देशांमध्ये सर्वत्र वापर याचे प्रतिनिधित्व दर्शवतो.मसाल्याच्या डब्ब्यात मानाचे स्थान असलेले तिरफळ (Ayurvedic Medicine Plant) हे बहुतेक लोकांना हे माहित नसते कारण त्याचा वापर ठराविक च केला जातो.

तिरफळाचा वापर माशाची आमटी बनवतांना खास करून केला जातो.बाकी हॉटेल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही बनवण्याकरीता केला जातो.हे Szechuan peppercorn या नावाने देखील ओळखले जाते.यास चिरफळ असे देखिल म्हटले जाते.याचा काटेरी वृक्ष असतो.याची फळॆ कच्ची असताना हिरवी असतात.पिकली कि लालसर काळपट होतात.कच्चे फळ कडू आंबट लागते,पिकली कि तीव्र प्रमाणात तिखट लागतात.अश्या या तिरफळाची माहीती आज आपण घेवूयात.(Tirphal Health Benefits)

आरोग्यासाठी तिरफळाचे फायदे (Ayurvedic Medicine Plant)

१)मासे शिजवतांना याचा उपयोग केला जातो,मासे अर्धवट पचणे,खराब मासे खाल्ले जाणे,कच्चे शिजवलेले मासे खाण्यात येणे यामुळे होणारे त्रास याने कमी होतात.

२)पोटात दुखून उचकी येत असल्यास तिरफळचूर्ण मध तुप हे मिश्रण वारंवार चाटावे.

३)पोटात वात धरल्यास म्हणजेच गॅसेस झाल्यास तिरफळचूर्ण हे लिंबूरस व हिंगासह घ्यावे.

४)आमवात या आजारात तिरफळाचा नित्य वापर लाभदायक ठरतो.तिरफळ व एरंडेल तेल रोज रात्री झोपतांना घ्यावे.

५)मुखात सतत कफाचा चिकटा असल्यास तिरफळ चूर्ण व मध हे चाटून घ्यावे याने जीभ स्वच्छ होते.

६)paralysis मुळे किंवा इतर कारणांनी जीभ जड होते शब्द उच्चारता येत नाही अडखळत उच्चारले जातात यात जीभेवर हे चूर्ण चोळावे व कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात.

७)सतत जंत होण्याची सवय असल्यास तिरफळ चूर्ण गुळ हिंग घेवून अर्धा ते एक तासाने एरंडेल तेल घ्यावे.

८)दातखीळ बसलेली असल्यास तिरफळ चूर्ण तोंडात सोडावे.

९)लघवी ला गढूळ व आग /दाह/ जळजळ युक्त होत असल्यास तिरफळ चूर्ण शहाळ्याच्या पाण्यासह प्यावे

१०) सातत्याने शिळे अन्न खाणे,फ्रिजमधील थंड पदार्थ खाणे,बाहेरचे हॉटेल मधील जेवण घेणे यामुळे अजीर्ण होण्याची सवय लागते यामुळे उलट्या ,जुलाब,सतत सर्दी-खोकला-शिंका येणे,अंगात बारीक बारीक ताप येणे,कफ होणे ,सांधे जखडणे,अंग जड होणे,दमा सारखा त्रास वाटणॆ अश्या तक्रारींमध्ये तिरफळ चुर्ण,लिंबू रस,हिंग ,काळी मिरी हे योग्य वेळेत घ्यावे,पाणी सेवन कमी ठेवावे.

सावधान………..!!

पित्तप्रकृती असलेल्यांनी व उष्ण काळात  याचा वापर टाळावा .अतिशय उष्ण द्रव्यांपैकी तिरफळ हे होय

वैधानिक इशारा

वरील उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याने करावेत.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी 

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०