सर्वात वर

बबडीज् उर्फ डाॅटरस् व्हर्सेस डाॅटर इन लाॅज्

बातमीच्या वर

डाॅ स्वाती विनय गानू 

सीन पहिला —          

सुकन्या झाली का ग झोप पूर्ण?काल किती उशीरापर्यंत जागी होतीस.खूपच अभ्यास असतो ग तुम्हाला.उठतेस का ? ही बघ तुझ्या आवडीची स्ट्राॅन्ग काॅफी आणलीय.तुला बेडवरच बसून प्यायला आवडतं नं.आणि काॅलेजला आज लेक्चरस्,प्रॅक्टिकल्स म्हणजे पूर्ण दिवस बिझी ग तुझा.मी टिफीन दिला तुला तर नको म्हणतेस तू. कॅन्टीनमध्ये आवडीचं खा हं. तुला बिबाज् मधून न्यू अरायव्हल घ्यायचेत न.तुझ्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून घेतलीय.अग राहू दे ते कपाट.मी आवरून ठेवेन दुपारी. नको वैतागूस तुझी पार्लरची उद्याची अपाॅइन्टमेंट घेऊन ठेवलीय मी.आणि हो तुला उद्या गरिमाच्या बर्थडे पार्टीला जायचंय न तर शुभ्राची गाडी घेऊन जा.  

सीन दुसरा —

काय ग आज उशीर झाला वाटतं उठायला? तू उठली नव्हतीस मग काय मीच केला सगळ्यांचा चहा.नाश्ताही मलाच करावा लागणार. आई काल रात्री उशीरापर्यंत ऑफिसचं प्रेझेंटेशन करत होते.झोपायला उशीर झाला म्हणून जागच आली नाही. मी निघू का? मिटिंग लवकर आहे आज. गाडी असली तरी ट्रॅफिक लागेलच. यायला उशीर होईल. हे बघ आज गाडी तू नको घेऊन  जाऊस .गाडी आज सुकन्याला लागणार आहे तू कॅब घे.तिला महत्वाच्या फंक्शनला जायचंय.आणि तू उशीरा येणार म्हणजे बाहेरच खाणं होणार नं तुझं.तुमचं  बरंय.नोकरीनिमित्ताने बाहेर असता मग घरचं बघायला आहेतच सासूबाई.एकाच घरातले ही सकाळी दिसणारी दोन दृश्यं
 घरातल्या बबडीजना एक न्याय आणि सुनेला दुसरा न्याय .अशा बबडीज त्यांच्या ममा डॅडच्या लाडक्या प्रिन्सेस असतात नाहीतर बबडीज असतात. त्या बबडीज लाडावलेल्या असतात.बबडीजना भावावर नाहीतर आईबाबांवर अधिकार गाजवायला फार आवडतं.आई या बबडीजना सगळं हातात देते.बबडीज स्वतःला खूप beautiful समजतात.दुस-यांना तसं वाटो न वाटो.बबडीज कुठल्याही कामाची जबाबदारी अजिबात अंगाला लावून घेत नाहीत.बबडीजना आपली कामं 
दुस-यांकडून करून घ्यायला खूप आवडतं.बबडीजचं लक्ष सारखं दुस-यांच्या वस्तूंवर ,त्यांच्या कपडयांवर असतं बबडीजना घरातल्या वहिनीची साडी,टाॅप्स,कुडते,पर्स,कानातले,गळयातले दागिने,ब्रेसलेट,परफ्युम्स परवानगी न घेता घालायला खूप आवडतं.परमिशन मागणं हा बबडीजना इनसल्ट वाटतो. 

बबडीजना हातात भरपूर पैसा लागतो कारण बबडीज् चा आवडता टाईमपास असतो शाॅपिंग करणं,फ्लाॅन्ट करणं अर्थात शायनिंग मारणं.बबडीजचं घरातलं स्थान फार इम्पाॅर्टन्ट असतं.त्यांच्या शब्दाला साॅरी हट्टाला कुणीही नाही म्हणू शकत नाही. कारण त्या बबडीज असतात.बबडीजना दुखावण्याची कोणाकोणाची हिंमत नसते.बबडीज स्पेशल असतात.बबडीजनी वेस्टर्न आऊटफिट घालायला कोणी अडवत नाही पण डाॅटर इन लाॅज हिला मात्र लाॅजप्रमाणेच वागणं बंधनकारक नसतं.तेव्हा आपलं घराणं,संस्कृती, रीतिरिवाज यांना खूप महत्व प्राप्त होतं.बहुतेक घरात बबडीज साठी स्पेशल ट्रीटमेंट असते.बबडीजना जे आवडतं तोच मेन्यू घरात बनवला जातो.बबडीज किचनमध्ये जात नाहीत. स्वयंपाक, घरकाम यासारख्या गोष्टींसाठी आपला जन्म झाला नाही असं त्या ठामपणे सांगतात.चुकून जर त्यांनी कधी काही जसे की चहा,पोहे यासारख्या साध्याशा गोष्टी जरी केल्या तरी त्यांचं इतकं कौतुक होतं की फक्त आरती ओवाळणंच बाकी असतं. तिला बिलकुल सवय नाही अशा कामांची तरी किती टेस्टी केलं नाही असे संवाद सुनेच्या कानावर पडावे या पद्धतीने बोलले जातात.

बबडीजचा खरा रोल कधी सुरु होतो ठाऊक आहे?जेव्हा लाडकी वहिनी घरी येते.वास्तविक बबडीज दे आर व्हेरी इनोसंट. पण त्यांच्या लाडात नवा भागीदार आला की त्या बिथरतात.काही अपवाद असतात जिथे डाॅटर आणि डाॅटर इन लाॅज यांचे रिलेशन्स खूप छान अगदी मैत्रिणीसारखे असतात.सासूबाईंनी काही बोललं किंवा चुका काढल्या की बबडीज आपल्या वहिनीची बाजू घेतात.ढालीप्रमाणे त्यांचं रक्षण करतात.बबडीजचं जर पटलं ना वहिनीशी की मग त्या खूप नाहीतरी थोडं फार तरी सॅक्रिफाईस करतात. घरकामात किंचित किंचित मदत करतात.शाॅपिंगसाठी बरोबर घेऊन जातात.पण जर का सासूबाईंची आणि बबडीजची पार्टी एकत्र आली तर मात्र त्यांची पाॅवर वाढते.आणि हे जाॅईंट व्हेंचर डाॅटर इन लाॅज ला नकोसं करुन सोडतं.कधी दुस-या सुनेशी तुलना करुन की तुझ्या बाबांनी काय दिलं लग्नात इथपासून इतिहास दरवेळी उगाळला जातो.

बबडीजचं नातं बदलतं तेव्हा त्याचं नाव होतं ‘नणंद ‘ ज्याचा अर्थ नणंद म्हणजे न आनंद असं अभ्यासू स्त्रिया सांगतात. घरात काड्या लावणं हे त्यांचं आवडतं काम असतं.पण त्या हे विसरतात की कधीतरी त्यांना बबडीज मधून बाहेर पडून डाॅटरची ‘डाॅटर इन लाॅ ‘ व्हायचं आहे .म्हणूनच बबडीजच्या आईने डाॅटर आणि डाॅटर इन लाॅज ला समान वागवलं पाहिजे. बबडीज बनवण्यापेक्षा एक जबाबदार मुलगी होईल म्हणून कौतुकसोहळे फार न करता तिला मॅच्युअर अॅडल्टचं ट्रेनिंग देता येईल.नाहीतर जसे ‘करावे तसे भरावे’ ही म्हण लक्षात ठेवावी.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती विनय गानू 
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली