सर्वात वर

बीट आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २६)

डॉ.राहुल रमेश चौधरी

बाहेरच्या म्हणजेच युरोप अमेरिका देशातून आलेला हा पाहुणा अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि लहान घरापासून पंचताराकीत हॉटेल्स पर्यंत या पाहुण्याने सर्वांच्या मनात आरोग्यदायी बहुगुणी म्हणून घर तयार केले.कंदमूळ या प्रकारात बीट ( Beetroot ) हा प्रकार मोडला जातो.आयुर्वेद शास्त्रानुसार पचण्यास जड अश्या वर्गात मोडणारा पदार्थ म्हणून समावेश.हा कच्चा शिजवून तसेच भाजी बनवून देखील खाल्ला जातो.तसेच वेगवेगळ्या पदार्थ सजवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.याचा वापर कोशींबीर,बीटची ( Beetroot ) ताक,कच्ची बीट,उकडून सूप ,बीटचा हलवा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो.बीटच्या पानांची देखील भाजी बनवली जाते.अश्या बीट या कंदमूळाची आपण माहीती बघणार आहोत.आयुर्वेद शास्त्रात या पदार्थाचे गुणधर्म वर्णित नाही.

बीट ( Beetroot )आरोग्यास फायदेशीर

१.बीटची पाने लघवीस साफ करणारी,सूज कमी करणारी,शौचास साफ करणारी आहे.

२.बीट रक्तवर्धक,पौष्टीक,शक्तिवर्धक म्हणून ओळखले जाते.बीट शरीराचा फिक्कटपणा दूर करणारे,अशकतपणा दूर करणारे आहे.

३.शास्त्रीत मतानुसार यात प्रोटीन,शर्करा,स्टार्च सर्वाधिक प्रमाणात आढळते

४.यात साखरेचे प्रमाण असले तरी मधुमेही रुग्णांना चालणाऱ्या पदार्थात समाविष्ट होते.

५.तसेच यात जीवनसत्व ए,बी,सी,लोह,फॉस्फरस चे प्रमाण आढळते.

६.याचा वापर मांसाहारासह तंतुमय पदार्थ असल्याने ठेवावा,पाचक म्हणून याचा उपयोग होतो.

७.मूळव्याधी मध्ये शौच्याच्या जागी दुखणे,आग होणे,शौच्यास जाण्यास भीती वाटणेही लक्षणे असल्यास जेवणापूर्वी उकडलेले बीट कोथिंबीर टाकून खावे.

८.रक्तदाब वाढल्याने चिडचिड होणे,गरगरणे ,तोल जाणे,हि लक्षणे असल्यास बीट ,दूधी,मध हे मिश्रण उपाशीपोटी व रात्री घ्यावे फरक पडून लाभ मिळतो.

९.छातीत जळजळ होणे,उलट्या वांत्या कडू पाणी पडणे,आंबट पाणी पडणे,छातीत दुखणे याकरीता बीट रस खडीसाखर,हे मिश्रण जेवतांना घ्यावे.

सावधान

१.बीट हे कंदमूळ वर्गातील असून पचायल जड असल्याने भूक मंद असणाऱ्यांनी खावू नये.

२.बैठे काम करणाऱ्यांनी बीट उकडून खावे.

३.जुलाब होत असताना,भूक नसताना,पचनशक्ती उत्तम नसतान कच्चे बीट खावू नये.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०