सर्वात वर

भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचे निधन

नवी दिल्ली – सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट नरेंद्र चंचल (Narendra Chanchal) यांचे आज निधान झाले. ते ८० वर्षांचे होते. मागील तीन महिन्यांपासून ते आजारी होते. तीन दिवसापूर्वी त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीतील अपोलो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.आज दुपारी उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.दलेर मेहेंदी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकून त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

१९७३ मध्ये ऋषी कपूरच्या बॉबी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड मध्ये आपली एंट्री केली.बॉबी चित्रपटात ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ हे गाणे गायले होते आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले होते.त्यानंतर अनेक चित्रपटात त्यांनी गाणे गायले.‘अवतार’ या चित्रपटात गायिलेले ‘चलो बुलावा आया है’ या भजनाने नरेंद्र चंचल यांना खरी ओळख मिळवून दिली.

नरेंद्र चंचल (Narendra Chanchal) यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला प्रचंड दुःख झाले आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर वरून दिली आहे.