सर्वात वर

Big News : महाराष्ट्रातील ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरु होणार : शिक्षण मंत्र्यांची घोषणा

मुंबई –(Big News) कोरोना संसर्गाच्या काळात बंद झालेल्या शाळा अनलॉक होण्याची प्रक्रिया आता सुरु झाली असून महाराष्ट्रात इयत्ता ५ वी  ते आठवीचे वर्ग सुरु करणार असल्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या आधी राज्यात ४ जानेवारी पासून इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आला असल्याचे शिक्षण वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे असे ही त्या म्हणाल्या.यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. 

 येत्या २७ जानेवारी पासून राज्यात ५ वी  ते ८ वी हे वर्ग सुरु होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असून राज्यसरकारच्या या निर्णयामुळे २७ जानेवारी पासून शाळा पुन्हा गजबजणार आहेत. (Big News)