सर्वात वर

Big News : कोरोनाच्या लसीकरणा बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

नवी दिल्ली – कोरोना लसीकरणा (Corona Vaccination) बाबत केंद्र सरकारने आज मोठा निर्णय जाहीर केला आहे. १ एप्रिल पासून संपूर्ण भारतात सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात  ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्ली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी (Corona Vaccination) नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.


आज नई दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली त्या चर्च मध्ये हा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. . भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण (Corona Vaccination) केलं जात आहे.परंतु कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. देशातील नागरिकांना आतापर्यंत ४ कोटी ८५ लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी ४ कोटीं व्यक्तींना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं प्रकाश जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.

त्याचप्रमाणे मागील २४ तासांमध्ये विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना करोनाचे डोस (Corona Vaccination) देण्यात आले आहेत असंही जावडेकरांनी स्पष्ट केले.फेब्रुवारीमध्ये दिवसाला तीन लाख ७७ हजार करोनाचे डोस दिले जायचे. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे, असंही जावडेकरांनी सांगितले. मागील आठवड्यामध्ये (१४ ते २० मार्च दरम्यान) दिवसाला करोना लसींचे २० लाख डोस देण्यात आल्याची माहिती ही प्रकाश जावडेकरांनी दिली.