सर्वात वर

मोठी बातमी : १ मार्च पासून देशातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत कोरोना लस

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती 

नवी दिल्ली – देशातील ज्येष्ठ नागरिकांना येत्या १ मार्च पासून कोरोनाची (corona Vaccine) मोफत लस दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

१ मार्चपासून ६० पेक्षा अधिक वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणाऱ्या ४५ हून अधिक वयाच्या नागरिकांना कोरोनाची लस (corona Vaccine) दिली जाणार असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. 

ही लसीकरण मोहीम १० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांवर पार पडणार आहे. तसेच  ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार,असल्याचंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे.