सर्वात वर

Big News : नवीन कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : गेल्या सप्टेंबर पासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा आदेश दिला आहे.सुप्रीम कोर्टाकडून नवीन तिन्ही कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलीअसून या निर्णयामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.सुप्रीम कोर्टाकडून एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत चारजणं असल्याची माहिती समोर आली आहे.शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा करण्यासाठी ही समिती बनवण्यात येईल

आज सुनावणी दरम्यान कोर्टाने कडक शब्दात केंद्राला सुनावलं होतं. ते म्हणाले की, कोर्टाकडून तयार केलेल्या समितीमध्ये चर्चा होईपर्यंत हा कायदा स्थगित ठेवायला हवा.अन्यथा कोर्टाकडून हा कायदा रोखण्यात येईल.असे म्हंटले आहे.