सर्वात वर

बिग बॉस – १४ : Salman Khan-किंग ऑफ हार्टस ! ३ ऑक्टोबर पासून रसिकांच्या भेटीला

मुंबई-बिग बॉस १४ चा शुभारंभ मोठ्या धूमधडाक्यात झाला एका उच्च स्तरीय व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि याचे अध्यक्ष होते मास्टर होस्ट सलमान खान (Salman Khan). आता अनेक गोष्टींमध्ये भरपूर बदल झालेले दिसून येत असले तरी, सलमान खानने पुन्हा एकदा सिध्द केले आहे की तोच खरा किंग ऑफ हार्टस आहे.मनोरंजन, रोमांचकता आणि नाट्य अनलॉक करत असताना,  बिग बॉस सुरू होत आहे ३ ऑक्टोबर २०२० पासून, आणि प्रसारित होणार आहे प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री १०:३० वाजता आणि शनिवार-रविवारी रात्री ९:०० वाजता  कलर्स वर आणि  वूट सिलेक्ट.वर  रसिकांना बघता येणार आहे 

प्रेस कॉन्फरन्स मध्ये, सलमान खान (Salman Khan) त्याच्या मनातील गोष्टी सांगीतल्या, पँडेमिकच्या दरम्यान संपूर्ण देशाला सामना कराव्या लागणाऱ्या अडचणींविषयी काळजी व्यक्त केली आणि लोकांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे किती महत्वाचे आहे ते सांगीतले. हे वर्ष खूप कठीण गेले आहे असे सांगत, त्याने पुढे सांगीतले की टीमने मागील सीझन मध्ये सहभागी संपूर्ण कर्मचाऱ्यांना कायम राखण्यात यश मिळवले याचा मला आनंद आहे.  

सलमान खान(Salman Khan) बोलत असताना, आम्हाला त्याची मानवी बाजू दिसून आली, त्याने सांगीतले की त्याने कर्मचारी टीम मधील सर्व कामगारांना त्यांचा संपूर्ण पगार मिळाला यासाठी त्याने त्याचे पैसे घेतले नाहीत आणि त्यामुळे निर्मात्यांना जास्तीत जास्त लोकांना रोजगार देता येणे शक्य झाले आहे, व त्यामुळे या पँडेमिक मध्ये त्या लोकांचे जगणे सुसह्य झाले आहे. सर्व प्रकारची सजावट कायम राखण्यासाठी सेटवर मर्यादित व्यक्तीच राहतील यासाठी टीम प्रयत्न करत असताना, संपूर्ण टीमची संख्या पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात येणार आहे- नोकरी मध्ये आणि पगारामध्ये कपात केली जाणार नाही.  

त्याच्याशी जवळीक असणाऱ्या एका सूत्राने सांगीतले की परंपरा कायम राखत यावर्षी सुध्दा सलमान खानने त्याच्या फार्महाऊस वरून सर्व कामगारांसाठी जेवण मागवले होते, प्रत्येकाची योग्य काळजी आणि सुरक्षितता घेण्याचा हा सर्वात आरोग्यदायी मार्ग होता आणि हे करताना सलमान खानला खूप आनंद मिळाला.