सर्वात वर

Bird Flu : नाशिक जिल्ह्यात “बर्ड फ्लू”चा शिरकाव

नाशिक – नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील वाठोडा येथे घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu)ची लागण दिसून आली आहे.रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून येथील एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र तसेच १० किलोमीटर क्षेत्र हे निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. 

या परिसरात कोणतेही पोल्ट्रीफार्म नाही.त्यामुळे अद्याप घाबरून जाण्याचे कारण नाही.परंतु पोल्ट्री बाबत योग्यती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.या पुढील ९० दिवस या १० किलोमीटर परिसरात कोंबड्यांची खरेदी विक्री तसेच यात्रा ,बाजार , प्रदर्शन लावण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हंटले आहे.