सर्वात वर

Bird Flu : अफवांवर विश्वास ठेवू नये जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे आवाहन

नाशिक – नाशिक  जिल्ह्यामध्ये बर्ड फ्ल्यू’ची (Bird Flu) एकही केस अद्यापपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. 

अनावश्यक पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सध्या कोविड युद्धामध्ये उपयोगी ठरणारे प्रोटीनचे मार्ग म्हणून अंडी आणि चिकन यांच्या वापरावर  देखील अश्या अफवांमुळे प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या पदार्थांचा वापर सुरू ठेवावा असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.