सर्वात वर

मदर्स डे निमित्त झी मराठीवर या ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी

उत्सव नात्यांचा, ब्लॉकबस्टर सिनेमांचा

मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा संचारबंदी सुरु आहे.सगळीकडे फक्त संचारबंदीच्याच बातम्या सुरु आहेत, ह्या सर्व नकारात्मक गोष्टीतून बाहेर येण्यासाठी झी मराठी (Zee Marathi) रसिकांसोबत  असणार आहे.

झी मराठी (Zee Marathi) ह्या रविवारी म्हणजेच उद्या ९ मे मदर्स डे निमित्त दुपारी १२ आणि ४ वा. आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमांची मेजवानी,घेऊन येत आहे.    दुपारी १२ वा ‘रितेश देशमुख’, ‘तन्वी आझमी’ आणि ‘राधिका आपटे’ यांची प्रमुख भूमिका असलेला सुपरहिट चित्रपट “लय भारी” आणि संध्याकाळी ४ वा. ‘अलका कुबल’, ‘रमेश भाटकर’, ‘अजिंक्य देव’, ‘जयश्री गडकर’, ‘उषा नाडकर्णी’ आणि ‘विजय चव्हाण’ यांच्या अभिनयाने नटलेला आणि ९० च्या दशकात गाजलेला सुपरहिट मराठी चित्रपट “माहेरची साडी”. रसिक प्रेक्षकांना बघता येणार आहे.