सर्वात वर

बॉलिवूड अभिनेता असिफ बसरा यांची आत्महत्या 

मुंबई-बॉलिवूड अभिनेता असिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे मक्लोडगंज जोगिवाडा रोड वरील आपल्या राहत्याघरी आत्महत्या केली आहे.५३ वर्षीय अभिनेता आसिफ डिप्रेशन मध्ये होता.अद्याप त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही असिफ बसराच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडला आणखीन एक धक्का बसला आहे.आसिफ यांचा जन्म २७ जुलै १९६७ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. 

ब्लॅक फ्राय डे, परजानिया या सह अनेक सिनेमांमध्ये आठवणीत राहणाऱ्या भूमिका या कलाकाराने साकारल्या होत्या तसेच जब वी मेट, काय पो छे आणि  हिचकी या सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता.अ‍ॅमेझॉन प्राइम वरील वेब सिरीज ‘पाताल लोक’ मध्येही त्यांनी काम केलं आहे.आसिफ यांनी प्रेक्षकांमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. होस्टेजेस ही त्यांची शेवटीची वेब सीरिज ठरली.आसिफ बसरा यांनी १९९८ मध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘वो’ नावाच्या एका टिव्ही सिरिअल मध्ये त्यांनी पहिल्यांदा काम केले होते.