सर्वात वर

तीन दिवसांच्या मंदीला ब्रेक : शेअर बाजार वधारला

बातमीच्या वर

 बँक निफ्टी मध्ये ९९१ अंकांनी उसळी

आजचे संपूर्ण दिवसाचे सत्र खऱ्या अर्थाने अस्थिर(VOLATILE) स्वरूपाचे होते, त्याला कारणे सुद्धा विविध होते. सकाळी भारतीय शेअर बाजार आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे सकारात्मक उघडले काही काळ हे टिकले सुद्धा परंतु बाजारातील दिग्गज  कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आणि पुरवठा  बघायला मिळला यात विक्रीचा जोर दिसला रिलायन्स मध्ये तर दुसरीकडे मागणी दिसली बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये यात आय सी आय सी आय बँक, अक्सिस बँक , एच डी एफ सी त्याच बरोबर काही सकारात्मक आणि नकारात्मक कारणे बाजाराने मागील काही दिवसांमध्ये VOLATILE ठेवण्यास कारणीभूत ठरत आहेत त्यात प्रामुख्याने आहेत , जागतिक स्तरावरील कोविड-१९ चे वाढती रुग्ण संख्या आणि त्यामुळे काही देशात परत लॉकडाउन ची केलेली घोषणा त्याचप्रमाणे अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणूका , देशांतर्गत जी एस टी च्या माध्यमातून जमा झालेला चांगला रेव्हीनू आणि बाजारात विविध क्षेत्रांत विदेशी आणि देशातील वित्तीय संस्था यांच्या कडून होत असलली नफा वसुली याचाच परीणाम आज सुद्धा बाजारात बघायला मिळला आणि तीन दिवसांच्या मंदीला ब्रेक बसला  

त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक १४३ अंकांनी वधरून ३९७५७ ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास शेअर्सचा निर्देशांक निफ्टी सुद्धा २७ अंकांनी वधारून ११६६९ ह्या बंद झाला तर खऱ्या अर्थाने बाजराला सावरले ते बँकिंग क्षेत्राने त्यामुळे बँक निफ्टी तब्बल ९९१ अंकांनी वधारून २४८९२ ह्या पातळीवर स्थिरावला.

आजच्या बाजाराचे तसे आकर्षण ठरले ते बँकिंग क्षेत्र आणि RELIANCE.RELIANCE चा स्टॉक तब्बल ९% ने घसरला  तर बाजाराला सावरण्याचे काम चांगल्या ती माही निकलांच्या आधारे बँकिंग क्षेत्रातील शेअर्स ने केले. बाजाराच्या लांबीचा विचार केला तर १०८० समभाग सकारात्मक होते तर १५३५ समभाग नकारात्मक दिसले आणि १४८ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसला नाही.
बाजारातील जाणकार आणि एल के पी सेक्युरीटीज यांचे फंडामेंटल हेड श्री एस रंगनाथन यांनी आजच्या बाजाराबद्दल सांगितले की , अमेरिकेतील निवडणूकणांमुळे यापुढे बाजार volatile बघायला मिळाला आणि पुढे सुद्धा मिळेल त्यामुळे गुंतवणूकरदारांनी सावध पवित्र्यात राहावे, गुंतवणूक ही दीर्घ अवधी साठी आणि विविध क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूक असायला हवी. 


निफ्टी ११६६९ + २७

सेन्सेक्स ३९७५७ + १४३

बँकनिफ्टी २४८९२ + ९९१


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स
इंडुसिंदबँक ६२३ + ६.४५%

आय सी आय सी आय बँक ४१६ + ६%

अँक्सीस बँक ५२२ + ६% 

एच डी एफ सी २०२२ + ५%

भारती एअरटेल ४५५ + ५%


आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

रिलायन्स १८७६ – ९%

डेवीज लँब ३०५५ – ३%

आयशर   माेटर २०३३ – ३%

एच सी एल टेक ८२२ – २%

टि सी एस २६०८ – २%


यु एस डी  आई एन आर $ ७४.५७५० 

सोने १० ग्रॅम        ५०९३०.००

चांदी १ किलो         ६१८४०.००

क्रूड ऑईल            २५९६.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे,नाशिक
8888280555

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली