सर्वात वर

Breaking News : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

 नाशिक – पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी ट्विट करून दिली आहे.आपल्या ट्विट मध्ये भुजबळ यांनी नागरिकांना योग्यती काळजी घेण्याचे आवाहन हि केले आहे.

 ते पुढे म्हणाले माझी प्रकृती उत्तम असून गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वानी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन हि छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) यांनी  केले आहे. काल दुपारीच साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती.या बैठकीत महामंडळाच्या अध्यक्षांसह सर्वच महत्वाचे पदाधिकारी हजर होते.छगन भुजबळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आता सगळ्यांचीच धाकधुक वाढली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेच्या आमदाराच्या लग्नात पवारांसह भुजबळांची होती हजेरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकशहरात पार पडला. या विवाह समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून  २४ तासही उलटत नाहीयत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती. भुजबळांबरोबर शरद पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर तसंच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी लग्नसोहळ्याला उपस्थित होते.