सर्वात वर

Breaking News : दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा 

मुंबई – (Breaking News)  महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्वत: ट्विट करुन  दिली आहे. दहावीच्या परीक्षा या जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.सध्याची परिस्थिती ही परीक्षा घेण्यासाठी योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. विद्यार्थींचे आरोग्य हे महाविकास आघाडी सरकारसाठी प्राधान्याची गोष्ट असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले.दोन्ही परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे.

Breaking News