सर्वात वर

खजुराचा केक

खजूर सगळ्यांनाच आवडतात आणि केकही सर्वांना आवडतो मग आपण खजुराचाच केक (Khajur Cake)केला तर , एकदम पौष्टिक आणि खायला रुचकर . लहान मोठ्यांचा आवडता खाऊ .

सीमा अमरेश देशपांडे,पुणे

साहित्य :-मैदा – २ कप , बटर – १/२ कप , अंडी – २ , पिठी साखर – १ कप , खजूर तुकडे – १ कप , दूध – १ कप , बेकिंग पावडर – १ चमचा , बेकिंग सोडा – १ चमचा , काही ड्राय फ्रूटस चे तुकडे .

कृती :- गरम दुधात खजुराचे तुकडे भिजत ठेवावे . बटर फेसून घ्यावे मग त्यात पिठी साखर घालून पुन्हा फेसावे . बटर आणि पिठी साखर फेसून झाल्यावर त्यात अंडी घालून पुन्हा फेसावे. एका भांड्यात मैदा , बेकिंग पावडर व सोडा चाळून घ्यावे . अंड्याच्या मिश्रणात मैदा चाळलेले सर्व साहित्य घालून चांगले मिसळू घ्यावे मग भिजवलेले खजूर दुधा सोबत घालावे . केकच्या भांड्याला आतून तेल लावून ग्रीस करून त्यात केकच्या मिश्रण ओतावे आणि २० मिनिट केक बेक करावा . केक तयार झाल्यावर ड्राय फ्रूट ने सजवावा

टीप 

• खजूर ऐवजी तुमच्या चवीप्रमाणे फ्रूट टाका

• बटर ऐवजी घरातील लोणी चालेल

• अंडी ऐवजी मिल्क मेड १ कप घाला 

आणि आपला स्वादिष्ट केक(Khajur Cake) तयार……
[email protected]