सर्वात वर

गाजराची कोशिंबीर

रेखा केतकर 

घरातील लहान मुले हि कोशिंबीर आवडीने खातात. रोजच्या जेवणात पोळी बरोबर ही कोशिंबीर छान लागते. चला मग आज करून बघूया गाजराची कोशिंबीर (Carrot Salad)

साहित्य – ४/५ गाजरं , दाण्याचं कूट , मीठ , साखर , लिंबू , कोथिंबीर

फोडणीचं साहीत्य –  ४ मिडीयम चमचे तेल , मोहरी , हिंग , हळद , कडीपत्ता , चार पाच हिरव्या मिरचीचे तुकडे , 

कृती – प्रथम गाजरं स्वछ धुऊन साल काढून किसून घ्यावीत नंतर त्यात चवी नुसार साखर , मीठ , दाण्याचे कूट घालून त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालावा आणि मग त्याला वरतून तेलाची फोडणी द्यावी आणि वरतून कोथिंबीर घालावी , रुचरूचीत आणि चविष्ट गाजराची कोशिंबीर(Carrot Salad) तय्यार

Rekha Ketkar
रेखा केतकर