सर्वात वर

CBSC बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या नंतर सीबीएससी बोर्डाच्या (CBSC board’s) विद्यार्थ्यांचे काय होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला होता.आता सीबीएससी बोर्डाने ही मोठा निर्णय घेतला असून सीबीएससी  बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द तर १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे.आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी((Prime Minister Narendra Modi))यांनी  शिक्षण मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात मे महिन्यात होणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सीबीएससी बोर्डाची (CBSC board’s) दहावीची आणि बारावीची परीक्षा रद्द करावी असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसापूर्वी केंद्र सरकार कडे केली होती. दिल्ली सह इतर राज्यात कोरोनाच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकाने हा निर्णय घेतला आहे.