सर्वात वर

CBSE १२ वीच्या परीक्षा अखेर रद्द

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारने CBSE च्या बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णयघेऊन  CBSE बारावी बोर्डाची परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. आज 12 वीच्या बोर्डाच्या परिक्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. दरम्यान महाराष्ट्रातील  HSC परीक्षेबाबतचा निर्णय गुरुवारी घेण्यात येणार आहे.

परीक्षा रद्द करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदी आपल्या  ट्विटमध्ये म्हणतात, “सरकारने CBSE बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. शिवाय हा निर्णय आपल्या तरूणाईच्या सुरक्षेसोबत त्यांच्या भविष्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.”