सर्वात वर

चला हवा येऊ द्या चा मंच होणार संगीतमय

मुंबई – झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya)संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ७ वर्षे हवा येऊ द्या च्या मंचावर आजवर अनेक दिग्गज स्टार्स ने हजेरी लावली, या मध्ये प्रामुख्याने बॉलीवूड मधले सुपरस्टार ‘आमिर, शाहरुख खान , सलमान खान ’ यांना देखील चला हवा येऊ द्या चा मंच आपलासा वाटला, आमिर खान यांनी तर भाऊ कदम सोबत मराठीत स्किट सुद्धा सादर केलं. 

आता आठवड्यात चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) चा रंगमंच संगीतमय होणार आहे. झी मराठी वरील (Zee Marathi)चला हवा येवू दया च्या मंचावर हजेरी लावली ती गायक कैलास खेर, सावनी रवींद्र, वैशाली माढे, यांनी या वेळेची थीम होती असे गायक ज्यांनी आपल्या प्रादेशिक सीमा ओलांडून राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कमावलं, तसेच ‘झी टीव्ही’ वर सध्या गाजत असलेल्या ‘इंडियन प्रो म्युझिक लिग’ चं. ‘कैलास खेर’ मंचावर येताच त्यांनी आपल्या पहाडी आवाजात मराठी मातीतलं ‘जीवा शिवा ची बैल जोड’ हे गाणं गायलं आणि उपस्थितांची मन जिंकून घेतली, एकंदरीतच ह्या कार्यक्रमात ह्या नामवंत गायकांचा प्रवास आपल्याला अनुभवता येणार आहे.

‘इंडियन प्रो म्युझिक लिग’ या कार्यक्रमातून मुंबई टीम चं प्रतिनिधित्व करणारे पुर्वा मंत्री, इरफान, रचित अगरवाल हे स्पर्धक गायक यांनी देखील ह्या मंचावर उपस्थिती लावली होती.  याच ‘इंडियन प्रो म्युझिक लिग’ मुंबई टीम चे कर्णधार कैलाश खेर आहेत.

राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या या गायक दिग्गजांना चला हवा येऊ द्या (Chala Hava Yeu Dya) च्या मंचावर सोमवार ५ ते बुधवार ७ एप्रिल रात्री ९. ३० वा. झी मराठीवर (Zee Marathi) रसिकांच्या भेटीसाठी येणार आहेत.