सर्वात वर

नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

बातमीच्या वर

मुंबई  : नाशिक येथे २६ ते २८ मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी केली. नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनासाठी  लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी निमंत्रण दिले आहे.

संपूर्ण जगासह आपण  गेल्या वर्षभरापासून कोविडचा लढा लढत असून या परिस्थितीत आता झपाट्याने सुधारणा होत आहे, या पार्श्वभूमीवर या  साहित्य संमेलनात आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पडले जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला तसेच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचे  वातावरण निर्माण होईल तसेच या संमेलनाच्या आयोजनास मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छाही दिल्या. डॉ जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसेच साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी  लाभल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी हे संमेलन डिसेंबर-जानेवारीत होणार होते परंतु कोरोना संकटामुळे मार्चमध्ये घ्यावे लागत आहे अशी माहिती दिली आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली