सर्वात वर

Big News : राज्यातील चित्रपटगृह ,नाट्यगृह आणि तरणतलाव सुरु होणार

बातमीच्या वर

मुंबई – (Big News) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कलाक्षेत्रातील लोकांसाठी राज्य सरकारने Good News दिली आहे. मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी म्हणजे उद्या ५ नोव्हेंबर पासून राज्यातील नाट्यगृह, चित्रपट गृह आणि मल्टिप्लेक्स  सुरु करण्यास परवानगी दिली आहे.तसेच कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नाट्यगृह, चित्रपट गृह आणि मल्टिप्लेक्स सह शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

 सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहं एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह उद्यापासून सुरु होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याच सोबत करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं उद्यापासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.(Big News)

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली