सर्वात वर

आज नाशिक शहरात ४५ वर्षावरील नागरीकांना मिळणार ‘कोविशील्ड’ चा पहिला डोस

शहरात एकूण ९ लसीकरण केंद्रावर मिळणार लस : तीन केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस 

नाशिक – शहरात काही दिवसापासून ४५ वर्षावरील नव्याने लस घेणाऱ्या नागरीकांचे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. शहरात असणारा लसीचा तुटवडा लक्षात घेऊन आरोग्य विभागाने काही दिवस ज्या नागरीकांचा दुसरा डोस  बाकी आहे अशाच नागरीकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.परंतु आज पासून ४५ वर्षावरील नागरीकांना ‘कोविशील्ड’ (Covishield) पहिला डोस मिळणार असल्याचे नाशिक महानगर पालिके तर्फे कळविण्यात आले आहे. 

आता आज नाशिक शहरातील ६ लसीकरण केंद्रावर जे नव्याने लस घेणार आहेत अशा ४५ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.या केंद्रावर कोविशील्डची (Covishield) लस मिळणार असून उर्वरित ३ लसीकरण केंद्रावर ज्यांचा  कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस बाकी आहे अशाच नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.अशी माहिती नाशिक महानगर पालिकेतर्फे देण्यात आली आहे. 

शहरातील लसीकरण केंद्र(Vaccination Center)

 १) JDC बिटको हॉस्पिटल 
२) गोरेवाडी (UPHC)
३) जिजामाता  (UPHC)
४) सिडको  (UPHC)
५)वडनेर  (UPHC)
६) संजीव नगर  (UPHC)

४५ वर्षावरील कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरीकांसाठी लसीकरण केंद्र (Vaccination Center)

१)नाशिकरोड (UPHC) खोले मळा 
२)इंदिरा गांधी हॉस्पिटल ,पंचवटी कारंजा 
३) ESIS हॉस्पिटल ,सातपूर