सर्वात वर

स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत सिटी सेंटर मॉल प्रथम

नाशिक : ग्राहकांच्या स्वच्छता आणि आरोग्याबाबत नेहमीच दक्ष राहणार्‍या व लाखो नाशिककरांच्या हक्काची समूहबाजारपेठ असलेल्या सिटी सेंटर मॉलने (City Center Mall) आणखी एक मोलाची कामगिरी केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बाजारपेठ गटात मॉलने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील लाखो ग्राहकांच्या खरेदी आणि विरंगुळा यासाठी हक्काचे ठिकाण झालेल्या सिटी सेंटर मॉलमध्ये नेहमीच स्वच्छता आणि आरोग्याबाबत काळजी घेतली जाते. त्यासाठी खास प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे. येथील पार्किंग पासून ते मॉलच अंतर्गत व बाह्य परिसर, स्वच्छतागृह अशा सर्वच ठिकाणी आधुनिक सामग्रीच्या साह्याने स्वच्छता केली जाते. दरम्यान या स्पर्धेसाठी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या अंतर्गत असलेल्या विभागातील हॉटेल, शाळा व कॉलेज, दवाखाने, रहिवासी संकुल, शासकीय संस्था व बाजारपेठ या आस्थापनांचा महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले .

त्यावेळी स्वच्छतेबाबत जागृती करून त्यांची पाहणी करण्यात आली. त्यासाठी १ ते २६ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये कालबध्द कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेच्या सहा विभागांमध्ये त्यांना नेमून देण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार अंमलबजावणी करून विभागस्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या आस्थापनांची निवड करण्यात आली.  त्यातून पुन्हा शहर स्तरावर आयुक्तांनी समिती स्थापन केलेल्या समितीने प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाच्या आस्थापनांची निवड केली. त्यात संपूर्ण नाशिक शहरात बाजारपेठ विभागात सिटी सेंटर मॉल (City Center Mall) प्रथम आला. 

कोव्हिड-19 लॉकडाऊनपूर्वीच मॉलने घेतली होती स्वच्छतेची दक्षता 

उल्लेखनीय म्हणजे भारतात कोरोंना रुग्ण सापडल्यानंतर फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच मॉल व्यवस्थापनाने पुढाकार घेत, निर्जंतुकीकरणाची अतिरिक्त काळजी घ्यायला सुरुवात केली होती. त्याअंतर्गत सॅनिटायझर, मास्कचा वापर सुरू करून कोरोना प्रसार रोखण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले होते.  त्याचे नाशिककरांनी कौतुक केले होते. सद्य:स्थितीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिटी सेंटर मॉलमध्ये दर तासाला सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण होत असून मास्कचा वापर, तापमानाची नोंद, शारीरिक अंतर अशी दक्षता घेण्यात येत आहे.