सर्वात वर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईतील जे जे हॉस्पिटल मध्ये सहकुटुंब कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या मातोश्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते.लस टोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  जवळपास अर्धा तास रुग्णालयातच देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं.

यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले “मी स्वतः लस घेतली आहे आणि तुमच्या समोर उभा आहे मनापासून सांगतो लस घेतांना कळतसुद्धा नाही एवढया छान पद्धतीने लस दिली जात आहे. ज्यांना ज्यांना लस घेण्यासाठी पात्र ठरवले आहे त्यांनी मनात किंतु -परंतु न आणता लस घ्यावी असे त्यांनी जनतेला आवाहन केले. 

देशभरात १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली. यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही कुटुंबासह कोविशिल्ड लस घेतली होती