सर्वात वर

नारळाचे आरोग्यास फायदे (आहार मालिका क्र – ४)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

 माड किंवा नारळ श्रीफळ  हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे समुद्रकिनारे आणि लगतच्या भागात वाढणारा, ताड कुळातील एक वॄक्ष आहे. दक्षिणेकडील फळ,कल्पवृक्ष असा लौकीक असणारे नारळ हे उष्ण कटीबंधातील फळ आहे. मोहाचा नारळ व साधा नारळ असे २ प्रकार नारळाचे मिळतात. पाण्याची चव, खोबऱ्याची चव, खोबऱ्याचा रंग, आकार, वजन, खोबऱ्याचे प्रमाण, खोबऱ्याचा आतील भागाचा थर, जाती, झाडांची उंची यानुसार नारळाचे वैविध्य सापडते.यावरुन श्रेष्ठ व कनिष्ठत्व ठरते.आजच्या भागात नारळाचे आयोग्यास (Coconut  Benefits) काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात

नारळाचे आरोग्यास फायदे (Coconut  Benefits)

१.सोलकढी,मीठाई,पाक,वड्या,लाडू,माडी,तेल या विविध उपयोगी असलेले नारळ बहुगुनीच.

२.नारळ(Coconut  Benefits) गुणांनी थंड,ह्रद्यास हितकारी,वीर्यवर्धक,पचण्यास हलके,तहान व पित्ताचे शमन करणारे असून चवीने गोड आहे.मूत्राशयास स्वच्छ करणारे आहे,अग्निस वाढवणारे आहे.

३.खोबरेल तेल थंड,गोड,जड,पित्त शांत करणारे,कफ वाढवणारे,केश वाढवणारे व मुलायम करणारे आहे.खोबरेल तेलाने जखमा लवकर भरतात व जखमांची आग दूर होतो.

४.नारळाची शेंडी जाळून केलेली राख मधात चाटून खाल्ल्यास उलटी व उचक्या थांबतात.

५.नारळ पाण्यात गूळ व धने टाकून प्यायल्याने दाहयुकत मूत्रविकार दूर होतात.

६.नारळाचे पाणी,निर्मळी बी व वेलदोडा एकत्र करून प्यायल्याने रक्तपित्ताचे विकार व लघवीचे विकार दूर होतात

७ .नारळाच्या (Coconut  Benefits) करवंटीपासून निघणाऱ्या तेल चोळल्याने खरूज व खाज सूटण्याचे प्रमाण कमी होते.

८.खवूट खोबरे मुळ्याच्या रसात उगाळून उंदीर चावल्याच्या ठिकाणी लावल्यास आराम मिळ्तो.

९.पाण्याच्या नारळाला छिद्र पाडून त्यात सैंधव भरावे व मातीने लिंपावे, माती सुकल्यावर शेणाच्या गोवऱ्या पेटवावे व त्यात नारळ भाजावा त्यांनतर भाजलेल्या नारळात टाकलेले सैधव मीठ पचन,पोटदूखी या करीता वापरावा.

१०.ओल्या नारळाचे दूध काढून उकळावे त्यातून मिळालेले तेलात वाताचे औषधे टाकून सांध्याना लावल्यास जखडलेले सांधे सूटतात व वात कमी करतात.

११.ओले नारळाचा रस काढून तो थोडा घट्ट होईपर्यंत उकळावा ,त्यात सुंठ,जायफळ,मिरे,पिंपळी,जायपत्री हे मिश्रण अम्लपित्त,पोटदुखी,प्लीहा वाढणे यात उपयोगी ठरते.

१२.ओल्या नारळाचे तेल वेगवेगळ्या प्रकारे वापरल्यास जखमा, वातविकार यावर उपयोगी ठरते.

१३.ओल्या नारळाचे तेल वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध केल्यास ह्द्यरोगात फायदेशीर ठरते.

१४.साखर किंवा गुळासह लहान मुलांना खोबरे खायला दिल्यास शरीर धष्टपुष्ट बनते.

१५.बारीक शरीराच्या तरुण तरूणींमध्ये हिवाळ्यात खोबरे व गूळ चावून खाल्ल्याने हाडांचे पोषण,शरीर पोषण,छातीचे भरणे,सुडौल वाढ होते.

१६.खवलेले खोबरे त्यात निम्म्मे नारळ पाणी ,नारळ पाणी प्रमाणात गाईचे तूप व खवलेल्या खोबरे एवढे साखर घेवून मंद आचेवर शिजवावे,ते पाकाप्रमाणे झाल्यास त्यात सुंठ,मिरे,पिंपळी,दालचीनी, वेलदोडे,जायफळ,जायपत्री,जिरे,विडंग,बडीशोप टाकावी व पाक तयार करावा,हा पाक अति मैथुनाने क्षीण झालेली मैथुनशक्ती,डोळ्यांचे विकार,मासिक पाळीचे विकार,पायावरील सूज,विषदोष,वातरक्त यावर हितकारी असून भूक वाढवणारा आहे,मनाची तृप्ती करणारा असून ,ह्र्द्यास हितकर आहे.

१७.ओले नारळ खवून त्यापासून सोलकढी,नीरा सारखे रस धातु भरून काढणारे पेय तयार करता येते.,नारळाच्या वड्यासारखा सर्वांच्या आवडीचा पदार्थ तयार करता येतो.

१८.खवलेले नारळ घेवून ते एक चौठाई भाग गाईच्या तूपात भाजावे त्यात खवलेल्या खोबऱ्याएवढे साखर व साखरेचा आठ पट नारळ पाणी घालून पाक करावा,त्यात वेलदोडे,तमालपत्र,दालचीनी,धने, नागकेशर, जिरे, शाहजिरे, नागरमोथे, पिंपळी, सुंठ टाकावे तो पाक अम्लपित्त,क्षयरोग,मंदाग्नी,यात उपयोगी ठरते, तसेच रस ,रक्तादी ७ धातुंची वाढ होते.

सावधान!!

१.सुके खोबरे उष्णता वाढवणारे,कोरडे असते त्याने खोकला व श्वासाचा त्रास  होवू शकतो.

औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र   

संपर्क-९०९६११५९३०