सर्वात वर

Colors Marathi : अभिमन्यू – लतिकाला मिळणार एकमेकांची खंबीर साथ !

मुंबई : कलर्स मराठीवर (Colors Marathi) अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका सुंदरा मना मध्ये भरली या मालिकेध्ये अभिमन्यू आणि लतिकाचे वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीजरी मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते नेहमीच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात.मग ते अभिचे स्वप्न पूर्ण करायचे असो वा दौलतच्या विरुध्द उभे राहायचे असो वा सज्जन कामिनीपासून पाठ सोडवणे असो.अभिला त्याचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी लतिकाने त्याला मोलाची साथ दिली.

या सगळ्या प्रकरणामुळे अभिच्या मनामध्ये लतिकाबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण झाली आहे. ‘लतिका आणि अभिचे  कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार’ असे लतिकाने अभिला सांगितले आहे.अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार आहे अभिची साथ..असे नक्की काय घडणार आहे? ते आपल्याला १० तारखेला कळेलच. एकमेकांच्या साथीने हे दोघे कशी करतील सारी स्वप्न साकार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.. ही अभिमन्यु आणि लतिकाच्या नात्याची नवी सुरुवात तर नाहीना ? बघूया मालिकेमध्ये पुढे काय घडत.

प्रेक्षकांच्या दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे कलर्स मराठी (Colors Marathi) वरील सुंदरा मना मध्ये भरली या मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले. मालिकेतील पात्र, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे .अभीची आई म्हणजेच अतिशा नाईक,अभिची वाहिनी तसेच कामिनी, सज्जनराव यांची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे.सध्या मालिकेमध्ये शर्यतीचा मुद्दा सुरू आहे ज्यात दौलतने अभिमन्यूला भाग घेण्याचे आव्हान दिले आहे.पण, अभीचे वडील याच्या पुर्णपणे विरोधात आहेत. अभिमन्यू लतिकाच्या साथीने कसा वडिलांचा होकार मिळवणार ? आणि तो शर्यतीत भाग घेणार का ? हे लवकरच प्रेक्षकांना समजेल .