सर्वात वर

कलर्स मराठीवर ११ एप्रिलला सूर नवा ध्यास नवा चा Grand Premier

मुंबई : कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय कार्यक्रम सूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची कार्यक्रमाचा Grand Premiere रविवार दिनांक ११ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता रसिकांना बघायला मिळणार आहे.हे कार्यक्रमाचे चौथे पर्व असून या कार्यक्रमाच्या मेगा ऑडिशन्स पार पडल्या ज्यामध्ये आपल्याला एक से बडकर गाणी ऐकायला मिळाली आणि या मधूनच महाराष्ट्राला १६ गायिका मिळाल्या या १६ गायिकांमध्ये रंगणार आहे विजेतेपद जिंकण्यासाठीचे संगीत युध्द आणि महाराष्ट्राला मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या Grand Premiere मध्ये निवडून आलेल्या १६ स्पर्धकांच्या सुरेल गाण्यांनी प्रेक्षकांना आनंद नक्कीच मिळणार आहे पण तोच आनंद द्विगुणीत होणार आहे कलर्स मराठी (Colors Marathi) वरील या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांचा धमाकेदार परफॉर्मन्स देखील असणार आहे.अवधूत गुप्ते यांनी नाच ग घुमा, परी म्हणू की अप्सरा आणि डिपाडी डिपांग गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच सोबत आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या गोड आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सावनी रविंद्रला ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला असून सूर नवा ध्यास नवाच्या मंचावर तिचा सत्कार करण्यात आला.