सर्वात वर

राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये रंगणार होळी – रंगपंचमी

मुंबई : सगळीकडे होळीची आणि रंगपंचमी जोरदार तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं आपापसातील वैर आणि मतभेद विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका राजा रानीची गं जोडी (Raja Ranichi g Jodi) मालिकेमध्ये रंगणार होळी – रंगपंचमी विशेष  ! मालिकेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 

संजु – रणजीत आणि संपूर्ण ढाले पाटील परिवार हा सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे… संजु आणि रणजीतच्या नात्यामध्ये आलेली कटुता आता हळूहळू दूर लागली आहे.पण अजूनही रणजीतने संजुला त्याच्याकडून झालेल्या चुकीबद्दल सांगितले नाहीये दुसरीकडे याचवरून पंजाबरावांनी रणजीतला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.रणजीत कडून पुण्यामध्ये  घडलेल्या चूकीबद्दल त्यांना माहीती आहे, असे सांगून ते रणजीतला धमकावत आहेत… म्हणजेच संजु आणि रणजीतच्या नात्यावरच संकट अजूनही टळलं नहोये हेच खरे. या होळी विशेष भागामध्ये संजू विरुध्द राजश्री कुठली नवी खेळी खेळणार आहे ?  संजूचं या सगळ्याला कशी सामोरी जाईल ? संजू आणि रणजीतचे हेच मागणे असणार येणारी सगळी संकट यांचे दहन होऊन जाऊदे… याचसोबत मालिकेमध्ये रंगपंचमी विशेष भाग देखील रंगणार आहे …  

संजुचं PSI होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत  करत आहे, आणि आता तर तिला रणजीतची खंबीर साथ देखील मिळाली आहे पुढे मालिकेमध्ये काय घडणार जाणून घेण्यासाठी बघत रहा लाडकी मालिका राजा रानीची गं जोडी(Raja Ranichi g Jodi) कलर्स मराठीवर !(Colors Marathi)  आणि नक्की बघा राजा रानीची गं जोडी होळी विशेष भाग येत्या शुक्रवार आणि शनिवार संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर ! (Colors Marathi) रसिकांना बघता येणार आहे.