सर्वात वर

कॉर्न पॅटिस

Indian Recipe Corn Patties

शीतल पराग जोशी 

साहित्य : 2 वाटी स्वीट कॉर्न दाणे, अर्धी वाटी खोवलेला नारळ, 7 बटाटे, 1 स्पून लिंबाचा रस, मूठभर कोथिंबीर, मूठभर मनुका, 2 हिरव्या मिरच्या, 6 चमचे कॉर्नफ्लोउर, साखर, मीठ, तेल

कृती : स्वीट कॉर्न दाणे थोडेसे पातेल्यात पाणी घेऊन शिजवून घ्यावे. नंतर ते चाळणीत ओतून निथळत ठेवावे.  बटाटे उकडून, सोलून स्मॅश करून घ्यावे. त्यात 4 चमचे कॉर्नफ्लोउर , चवीपुरते मीठ घालून गोळा मळून ठेवावा. यात तुम्ही मिरची पण टाकू शकतात.

 शिजलेल्या कॉर्नपैकी थोडे कॉर्न व हिरवी मिरची मिक्सरला जाडसर  वाटावी. वाटलेले कॉर्न एक बाउलमध्ये घेऊन त्यात नारळाचा चव, उरलेले कॉर्न, मुठ्भर कोथिंबीर, लिंबूरस, साखर, मनुके, चवीपुरते मीठ घालून एकत्र करून सारण तयार करावे.

 3 चमचे कॉर्नफ्लोउर घेऊन त्यात पाणी घालून पातळ batter  तयार करावे. बटाट्याच्या मिश्रणाचे लाडवा इतके गोळे तयार करावे. त्याला वाटीप्रमाणे आकार द्यावा. त्यात कॉर्नचे सारण घालून कडा बंद करून पॅटिसला थोडा चपटा आकार द्यावा. कॉनफ्लॉवरच्या बटरमध्ये  बुडवून गरम तेलात पॅटिस गुलाबी रंगावर तळावेत. तळायचे नसतील तर शालो  फ्राय करून घ्यावेत.

पुदिना आणि चिंचेची चटणी अथवा सॉस  बरोबर सर्व्ह करावे. मुलांना डब्यात द्यायला पण चांगले आहेत. तुम्हाला किती पॅटिस हवेत त्यानुसार प्रमाण कमीजास्त करावे.(Indian Recipe Corn Patties)

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२