सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ % तर शहरात ९५.६९ %

जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५० हजार ५५५ रुग्ण कोरोनामुक्त : सद्यस्थितीत जिल्ह्यात १८ हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक – नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसते आहे. प्रशासनाने २३ मे पर्यंत जाहीर केलेला लॉक डाऊन बरोबरच प्रशासनाने घेतलेली खबरदारी  आणि नागरीकांनी केलेल्या नियमांचे पालन या मुळे रुग्णसंख्येत घट होतांना दिसत आहे. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(Recovery Rate) ९३.९३ टक्के झाले असून शहरात हे प्रमाण ९५.६९ टक्के झाले आहे.हि दिलासादायक गोष्ट आहे, जिल्ह्यात सद्य स्थितीत १८ हजार ४९३ रुग्ण उपचार घेत असून शहरात ७ हजार ६३७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आता ८ टक्क्यांनी कमी झाला आहे असे कालच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख  ५०  हजार ५५५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १८  हजार ४९३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आत्तापर्यंत ४ हजार १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २ हजार १६०,  बागलाण ६३३, चांदवड ६३९, देवळा ६१३, दिंडोरी ६८१, इगतपुरी १८१, कळवण ५५८, मालेगाव ३८८, नांदगाव ३१९, निफाड १ हजार १७६, पेठ ८३, सिन्नर १ हजार ३११, सुरगाणा ३१८, त्र्यंबकेश्वर १९३, येवला २६५  असे एकूण ९ हजार ५१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार ६३७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ३३८  तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण   नसून असे एकूण १८ हजार ४९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७३  हजार २१० रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Recovery Rate)

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Recovery Rate) नाशिक ग्रामीण मधे ९१.९३  टक्के, नाशिक शहरात ९५.६९ टक्के, मालेगाव मध्ये  ८६.६३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate)९३.९३ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण २ हजार ०७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ७७०  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २८६  व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार १६२  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

लक्षणीय :

◼️३ लाख ७३ हजार २१० कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ५० हजार ५५५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  १८  हजार ४९३ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.९३  टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)