सर्वात वर

आता ६ ते ८ तासात मिळणार कोरोना टेस्ट रिपोर्ट

दातार जेनेटिक्सने नाशिकरांसाठी सुरु केली खास सेवा   

नाशिक – नाशिक मध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे.अनेक रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट यायला उशीर लागतो आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण ही मोठ्याप्रमाणावर वाढतो आहे. हा ताण लक्षात घेता दातार कॅन्सर जेनेटिक्स (Datar Cancer Genetics) अत्यावस्थ रुग्णांसाठी आणि आपत कालीन परिस्थिती असल्यास त्या रुग्णांचे कोरोनाची चाचणी रिपोर्ट (Corona test report) ६ ते  ८ तासात देण्याची व्यवस्था केली असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे. 

तसेच दातार जेनेटिक्सच्या (Datar Cancer Genetics) सर्व केंद्रांवर ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरीक तसेच १२ वर्षा खालील लहान मुले दिव्यांग व्यक्ती व गरोदर स्त्रियांचे सॅम्पल प्राधान्याने घेऊन त्यांना तात्काळ सेवा  (Corona test report) देण्याची सुविधा करण्यात आली आहे. 

सॅम्पल कलेक्शन सेंटरची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत असून स्मार्ट फोन धारकांना फास्ट ट्रॅक सॅम्पलची  व्यवस्था करण्यात आल्याचे दातार कॅन्सर जेनेटिक्स (Datar Cancer Genetics) तर्फे सांगण्यात आले आहे. नाशिककरांच्या सुविधेसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत असे हि निवेदनात म्हंटले आहे.