सर्वात वर

धक्कादायक : नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १५२२ रुग्ण तर शहरात ८११ नवे रुग्ण

मागील २४ तासात १५६२ कोरोनाचे संशयित ; २८२२ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर २ जणाचा मृत्यू ,६८२ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्यात आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आजची वाढ हि या वर्षातील सर्वात मोठी वाढ म्हणता येईल.आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे  नव्या रुग्णांमध्ये १५२२ वाढ झाली आहे. तर नाशिक शहरात नव्या रुग्णांच्या संख्येत आज ८११ ने वाढ झाली आहे .

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ८११ तर ग्रामीण भागात ५११ मालेगाव मनपा विभागात १८६ तर बाह्य १४ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १५६२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ६८२ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ .९० इतके झाले तर शहरात हा रेट ९२.४३ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ७२१७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५४९२ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २८२२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे २ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

(Corona Update)  

आज शहराची स्थिती – शहरात ८११ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ५६४ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८६,६१० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८०,०५७ जण कोरोना मुक्त झाले तर ५४९२ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

 नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-13-MAR-2021.pdf