सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २३६० तर शहरात १२८१ नवे रुग्ण ; १० जणांचा मृत्यू

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यातआज ही  कोरोनाच्या रुग्णांमध्येवाढ झाली असून काही दिवसांपासून जिल्ह्याचा रोजचा रुग्णांचा आकडा हा दोन हजारांच्या वरच असल्याने सातत्याने होणारी ही  वाढ आता चिंताजनक ठरते आहे आज जिल्ह्यात २३६० नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत १२८१ ने वाढ झाली आहे. आज ६७६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप  ४ हजार ५८० संशयितांची अहवाल येणे बाकी आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १२८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १०१६ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ९६,०३० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८२,८५१ जण कोरोना मुक्त झाले तर १२,०९५ जण उपचार घेत आहेत. तर शहरात आज १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.    

 आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-676

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2360
नाशिक मनपा-     1281

नाशिक ग्रामीण-      878

मालेगाव मनपा-     128

जिल्हा बाह्य-           73 

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2220


आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -10

नाशिक मनपा-        04

मालेगाव मनपा-       02

नाशिक ग्रामीण-       03

जिल्हा बाह्य-           01

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-21-MAR-2021.pdf