सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे २७७९ तर शहरात १५४४ नवे रुग्ण ; १२ जणांचा मृत्यू

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे.परंतु आज संपूर्ण जिल्ह्यात कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण हि वाढल्याची बाब थोडी समाधानकारक आहे. आज जिल्ह्यात २७७९ नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत १५४४ ने वाढ झाली आहे. आज २६९६ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप  ४ हजार ०४६ संशयितांची अहवाल येणे बाकी आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १५४४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १०८७ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ९७,५७४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८५,१५१ जण कोरोना मुक्त झाले तर ११,३३६ जण उपचार घेत आहेत. तर शहरात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली

(Corona Update)  

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2696
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2779
नाशिक मनपा-      1544

नाशिक ग्रामीण-     1101

मालेगाव मनपा-      103

जिल्हा बाह्य-            31 

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2232

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -12

नाशिक मनपा-        03

मालेगाव मनपा-       00

नाशिक ग्रामीण-       09

जिल्हा बाह्य-           00

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-22-MAR-2021.pdf