सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २९२५ तर शहरात १८९० नवे रुग्ण ;१८ जणांचा मृत्यू

दिवसभरात २१७९ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २ हजार ९२५ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत १८९० ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आज २१७९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ५ हजार १३२ संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

आज शहराची स्थिती (Corona Update) – शहरात १८९० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२६५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,०८,८०३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ९२,९६४ जण कोरोना मुक्त झाले तर १४,७११ जण उपचार घेत आहेत.तर शहरात आज ०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली

(Corona Update)  

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2179

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 2925

नाशिक मनपा-      1890

नाशिक ग्रामीण-     0917

मालेगाव मनपा-     0078

जिल्हा बाह्य-         0040

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2326

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -18

नाशिक मनपा-        08

मालेगाव मनपा-      04

नाशिक ग्रामीण-      06

जिल्हा बाह्य-          00

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-28-MAR-2021.pdf