सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे ३३३८ तर शहरात १८४९ नवे रुग्ण ; १५ जणांचा मृत्यू

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे.आजतर कोरोनाच्या रुग्णांचा उच्चांकच झाला आहे. गेल्या वर्षात सर्वात जास्त रुग्ण आज नाशिक जिल्ह्यात आढळले आहेत हि चिंतेची बाब आहे. आपण लॉक डाऊन कडे जातो आहे कीं काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.आज जिल्ह्यात ३३३८ नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत १८४९ ने वाढ झाली आहे. आज २२२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप  ५ हजार १०४ संशयितांची अहवाल येणे बाकी आहेत. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Corona Update)

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १८४९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२८१ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  १,००,९०३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८८,३८३ जण कोरोना मुक्त झाले तर ११,४१७ जण उपचार घेत आहेत. तर शहरात आज १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2224
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 3338
नाशिक मनपा-      1849

नाशिक ग्रामीण-     1191

मालेगाव मनपा-     0245

जिल्हा बाह्य-         0053

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2262

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -15

नाशिक मनपा-        10

मालेगाव मनपा-       01

नाशिक ग्रामीण-       03

जिल्हा बाह्य-           01

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-24-MAR-2021.pdf