सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३७८४ तर शहरात २२६२ नवे रुग्ण ;१५ जणांचा मृत्यू

दिवसभरात ३१०४ कोरोना मुक्त ; अद्याप ६ हजार २६९ संशयितांचे अहवाल प्रलंबित 

नाशिक – (Corona Update) आजच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात तूर्त लॉक डाऊन होणार नसल्याचे सांगितले जरी असले तरी जिल्ह्यातील निर्बंध कडक करणार असल्याच्या सूचना दिल्या आहे.नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ३ हजार ७८४ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत २२६२ ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.आज ३१०४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ६ हजार २६९ संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात २२६२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १५१० क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,१६,५३८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ९८,८७४ जण कोरोना मुक्त झाले तर १६,५१२ जण उपचार घेत आहेत.तर शहरात आज ०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली

(Corona Update)  

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-3104

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 3784

नाशिक मनपा-       2262

नाशिक ग्रामीण-     1335

मालेगाव मनपा-     0136

जिल्हा बाह्य-         0051

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2407

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -15

नाशिक मनपा-        04

मालेगाव मनपा-      00

नाशिक ग्रामीण-      11

जिल्हा बाह्य-          00

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/04/AGE-SEX-TEMPLATE-1-APR-2021.pdf