सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ३९९५ तर शहरात २३०५ नवे रुग्ण ; १८ जणांचा मृत्यू

दिवसभरात ३०५४ कोरोना मुक्त

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ३ हजार ९९५ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत २३०५ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे.आज ३०५४ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ५ हजार ४३५ संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.  

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात २३०५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १४८१ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,१८,८४३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,००,७५८ जण कोरोना मुक्त झाले तर १६,९२७ जण उपचार घेत आहेत.तर शहरात आज ०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली
(Corona Update)   

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-3054

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 3995

नाशिक मनपा-       2305

नाशिक ग्रामीण-     1513

मालेगाव मनपा-     0116

जिल्हा बाह्य-         0061

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2425

आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -18
नाशिक मनपा-        06

मालेगाव मनपा-      03

नाशिक ग्रामीण-      08

जिल्हा बाह्य-          01