सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ७५१८ कोरोना मुक्त : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ %

मागील २४ तासात जिल्ह्यात २२७६ नवे रुग्ण तर शहरात ९९९ कोरोनाचे नवे रुग्ण : २८४० कोरोनाचे संशयित :३४ जणांचा मृत्यू 

नाशिक – (Corona Update) आज नाशिक जिल्ह्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचा उच्चांक झाला असून जिल्ह्यात आज ७५१८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. हि नाशिकरांसाठी दिलासादायक बाब आहे. सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत. आज जिल्ह्यात २२७६ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ९९९ नवे रुग्ण आढळले आहेत. 

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९३.२३ % झाली आहे.आज जवळपास २८४० संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३४ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १२ ,मालेगाव महापालिका हद्दीत २ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ९९९ तर ग्रामीण भागात १२६८ मालेगाव मनपा विभागात ९ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९४.१९ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २०६९३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १०७३३ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६३४३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९२.२१%,नाशिक शहरात ९४.१९ %, मालेगाव मध्ये ८६.५५ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९५.३९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.२३ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात ९९९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण २२१९ क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत २,१४,०९५ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २,०१,६५३ जण कोरोना मुक्त झाले तर १०,७३३जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३४

नाशिक महानगरपालिका-१२

मालेगाव महानगरपालिका-०२

नाशिक ग्रामीण-२०

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४००४

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १७०९

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २५५९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी-

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३४

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२२३

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ६३४३

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)