सर्वात वर

नाशिक शहरात कोरोना रुग्णांचा उच्चांक आज शहरात ९४२ नवे रुग्ण

मागील २४ तासात जिल्ह्यात एकूण १३५६ नवे रुग्ण ,१६३१ कोरोनाचे संशयित तर ५२३ कोरोना मुक्त ,२ जणाचा मृत्यू

नाशिक – (Corona Update)नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठला असून आज शहरात तब्बल ९४२ नवे रुग्ण वाढल्याने नाशिककर नागरीकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १३५६   रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर २ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. 

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात ९४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ५६४ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८७,५५२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८०,२९९ जण कोरोना मुक्त झाले तर ६१९० जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.   

सायंकाळी आलेल्या अहवालात (Corona Update) आज नाशिक शहरात ९४२ तर ग्रामीण भागात २६९ मालेगाव मनपा विभागात १२६ तर बाह्य १९ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १६३१ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ५२३ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ३५ इतके झाले तर शहरात हा रेट ९१.७२ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ८०४८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ६१९० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २४९४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-14-MAR-2021.pdf