सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत ९ हजार ४११ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख २४ हजार ७२५ रुग्ण कोरोनामुक्त 

 नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे फेब्रुवारी महिन्यात १ हजार रुग्णांच्या जवळपास रुग्ण संख्या आली असतांना मार्च महिन्यात हा आकडा आता १० हजाराच्या जवळ पोहचल्याने नाशिककरांनी आता काळजी घेण्याची आवश्यकता आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाच्या  ९ हजार ४११ रुग्णांवर उपचार सुरु असून नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार २३० रुग्ण आहेत. जिल्ह्यातील १ लाख २४  हजार ७२५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ हजार १८४  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:(Corona Update)

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १६९, चांदवड ८१, सिन्नर १६१, दिंडोरी ६४, निफाड २३९, देवळा ६३, नांदगांव २५०, येवला १२०, त्र्यंबकेश्वर ६७, सुरगाणा ०६, पेठ ०३, कळवण ३६,  बागलाण ९६, इगतपुरी २६, मालेगांव ग्रामीण ७० असे एकूण १ हजार ४५१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ७ हजार २३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६४२  तर जिल्ह्याबाहेरील ८८ असे एकूण ९ हजार ४११  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १ लाख ३६ हजार ३२०  रुग्ण आढळून आले आहेत.

(Corona Update) : नाशिक जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९४. ०७ टक्के, नाशिक शहरात ९०.७० टक्के, मालेगाव मध्ये  ८६.८७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.६९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.४९ इतके आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे झालेले मृत्यु :

नाशिक ग्रामीण ८७० ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  १ हजार ७१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १८३  व जिल्हा बाहेरील ६० अशा एकूण २ हजार १८४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

लक्षणीय :
◼️१ लाख ३६ हजार ३२० कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख २४ हजार ७२५  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ९ हजार ४११  पॉझिटिव्ह रुग्ण.
◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९१.४९ टक्के

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)