सर्वात वर

जिल्हा सामान्य रुग्णालयातील लॅबची क्षमता ५ हजारापर्यंत जाणार : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक –नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे (Corona Update) प्रमाण वाढते आहे. रोज काही प्रमाणात कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित राहता आहेत सद्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील  लॅबची क्षमता ८०० ची आहे. पंरतु तिथे आता automatic extraction machine  स्थापन झालेले असून त्याचे कॅलिब्रेशनचे काम सुरु आहे. व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर स्वाब टेस्टिंग ची क्षमता ५ हजाराच्यावर जाणार आहे. तसेच बिटको हॉस्पिटल मधील लॅब चे गतीने काम करण्यात येणार आहे. २५ मार्चच्या आत बिटकोची लॅबही सुरु करण्यात येणार आहे. तिची क्षमता ५ हजार असणार आहे.अशाप्रकारे दिवसाला १० हजार नमुन्यांची तपासणी करु शकणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. तसेच या लॅबची क्षमता वाढल्याने कॉन्टक्ट ट्रेसिंग व स्वॉब तपासणी काम खूप सोपे होणार आहे. 

गर्दीवर टाकण्यात आलेल्या निर्बंधावर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे त्या निर्बंधात कोणतीही वाढ किंवा घट करण्यात येणार नाही. ते निर्बंध तसेच पुढे चालु राहतील. तसेच मास्कच्या बाबतीत सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणात वैशिष्ट्य दिसून येत असल्याने एक हजार रुपये दंड करण्यात येत होता. यामध्ये नागरिकांना भुर्दंड बसवणे हा हेतू नसून नागरिकांमध्ये या विषयाबाबत तातडीने जागृती निर्माण करणे हा हेतू होता.  याबाबत क्षेत्रीय स्तरावर नागरिकांत मध्ये अपेक्षित परिणाम आता दिसून येऊ लागल्याने तो सर्वत्र दोनशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच होमआयसोलेशनमध्ये राहणारे रुग्ण नियमांचे उल्लंघन करतांना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन बाबत फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. (Corona Update )