सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर ४०९९ नवे रुग्ण तर शहरात २०९० रुग्ण

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर बघायला मिळतो आहे. आज नाशिक जिल्ह्यात बाधित रुग्णांचा उच्चांक झाला असून आज   जिल्ह्यात ४०९९ नवे रुग्ण आढळले आहेत तर शहरातल्या रुग्ण संख्येत २०९० ने वाढ झाली आहे. आज २१५८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ५ हजार ५१७ संशयितांची अहवाल येणे बाकी आहेत. आज जिल्ह्यात ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

लॉक डाऊन बाबत ८ दिवसात निर्णय घेणार – पालकमंत्री छगन भुजबळ 

आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरात ठिकठिकाणी फिरून नागरीकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. त्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयी आढावा बैठक घेतली. नाशिक जिल्यातील नागरिकांना त्यांनी आठ दिवसाचा अल्टिमेटम दिला असून २ एप्रिल पर्यंत शहरातील कोरोनाची परिस्थिती न सुधारल्यास नाशिक मध्ये लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 
(Corona Update)  

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात २०९० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १३१७ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,०४,७३२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ९१,३११ जण कोरोना मुक्त झाले तर १२,३०९ जण उपचार घेत आहेत.तर शहरात आज ०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली

आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2158
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4099
नाशिक मनपा-      2090

नाशिक ग्रामीण-     1706

मालेगाव मनपा-     0231

जिल्हा बाह्य-         0072

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2283
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -09
नाशिक मनपा-       04

मालेगाव मनपा-      00

नाशिक ग्रामीण-      04

जिल्हा बाह्य-          01

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-26-MAR-2021.pdf